जेएनएन, नागपूर: प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासासाठी महा मेट्रो नागपूरच्या वतीने महा कार्डसाठी लागू असणाऱ्या शुल्कावर 100% सूट देण्याचा निर्णय 15 सप्टेंबर पर्यंत देण्यात आला होता जे कि आता 30 सप्टेंबरपर्यंत हे महा कार्ड आता मोफत देण्यात येणार आहे. केवळ रु.200 चा टॉप-अप करून हे महा कार्ड मोफत मिळवता येणार आहे. 

हे कार्ड पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून, महा कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या सहकार्याने जारी करण्यात आले आहे. सामान्य प्रवाशांसाठी मेट्रो भाड्यावर 10% सवलत आणि विद्यार्थ्यांसाठी 30% सवलत दिली जाते. पदव्युत्तर (पोस्ट ग्रेजुएट) विद्यार्थ्यांना महा कार्ड देखील अगदी मोफत देण्यात येत आहे महा कार्डसाठी लागू असणाऱ्या शुल्कावर 100% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केवळ रु.200 चा टॉप-अप करून आपण हे महा कार्ड मोफत मिळवू शकता.हे कार्ड पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून, प्रवासाच्या मेट्रो भाड्यावर 10% सवलत दिली जाते.

हेही वाचा:Maharashtra News: प्रभासच्या मेहुण्याच्या आत्महत्येला राजकीय वळण; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद मैंद यांना अटक