जेएनएनए, चंद्रपूर: Chandrapur Earthquake चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसररात उशिरा रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री 11 वाजून 19 मिनिटांनी हा भूकंप झाला असून, त्याची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली आहे. ही माहिती सेसमिक स्टडी ऑफ इंडिया (Seismology Department of India) च्या अधिकृत भूकंप अॅपवर नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी रात्री लातूर जिल्हातही भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाची नोंद झाल्यानंतर नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या तुलनेने खोलवर असल्याने मोठा धक्का जाणवला नाही. अनेक नागरिकांनी धक्के फारसे जाणवले नसल्याचे सांगितले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तरीही सतर्कता म्हणून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातील काही भागांमध्ये अधूनमधून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. तज्ञांच्या मते, ही हालचाल नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेचा भाग असला तरी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Ajit Pawar: अजित पवारांचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार-खासदार एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार