जेएनएन, नागपूर: विजया दशमी, धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक बघता, मेट्रो सेवेत वाढ करण्यात आली आहे.  दिनांक 02 ऑक्टोबर रोजी मेट्रो सेवा सकाळी 5 वाजतापासून रात्री 12 वाजतापर्यंत उपलब्ध असेल. शेवटची मेट्रो ट्रेन ही रात्री 12 वाजता चारही मेट्रो टर्मिनल स्टेशन (खापरी, ऑटोमोटिव्ह चौक, लोकमान्य नगर आणि प्रजापती नगर स्टेशन) येथून सुटेल.

या दोन उत्सवाच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. नागपूरच्या विविध भागातूनही या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. तसेच विजया दशमीच्या निमित्ताने रावण दहन असेल किंवा दसऱ्याला भेटीगाठी, शहरभर नागरिकांची रेलचेल चालू असते. विधान भवन चौक, नागलोक (कामठी रोड), ड्रॅगन पॅलेस (कामठी) येथे भाविकांची मोठी गर्दी असते. या सगळ्याचा विचार करून मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ झाल्याचा फायदा या प्रवाशांना होणार आहे. 

सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांच्या पसंतीस उतरलेली वाहतूक सेवा म्हणजे नागपूर मेट्रो रेल सेवा. मेट्रो हे वाहतुकीचे सर्वोत्तम, सुलभ, सुविधाजनक, किफायतशीर आणि सुरक्षित साधन आहे. नोकरीपेशा लोकांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरत आहे. राजपत्रित सुटयांच्या दिवशी मेट्रो प्रवाश्याना मेट्रो प्रवासावर 30% सूट देखील मिळणार आहे. 

हेही वाचा: Uddhav Thackeray Dussehra Rally: ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, जय्यत तयारीला सुरूवात