जेएनएन, मुंबई. Weather Update Today: वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीचा पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील मुंबई कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी आठवडाभर पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसापासून मुंबई शहर व उपनगरात जोरदार पाऊस पडत आहे. काल रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला आहे. त्यामुळे आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड व पुण्यासह घाटासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. आज महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अतिमुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकारीचे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, पालेभाज्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकार कडून पीक पाहणी सुरू केली आहे.