जेएनएन, मुंबई: काँग्रेस पक्षात विधानसभेतील विधिमंडळ नेता बदलण्याची जोरदार मागणी पक्षात सुरू आहे. विजय वड्डेटीवारांचे विधिमंडळ नेतेपद काढून दुसऱ्या नेत्याला देण्याची जोरदार मागणी पक्षात सुरू आहे. विजय वड्डेटीवार यांना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद मिळाल्याने काँग्रेस पक्षात विजय वड्डेटीवारांचे विधिमंडळ नेतेपद काढून दुसऱ्या नेत्याला देण्याची मागणी सुरू आहे.

काँग्रेस पक्ष एक व्यक्ती एक पद या विचारावर काम करत असून एकाच व्यक्तीकडे दोन पदे ठेवू नये अशी मागणी काँग्रेस पक्षातील आमदारांकडून केली जात आहे. विधिमंडळ नेतेपद आणि लोकलेखा समितीचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे असल्याने एक व्यक्ती एक पद या विचाराला तडा जात आहे, अशी भावना अनेक आमदार खासगीत व्यक्त करत आहेत. विधिमंडळ पद बदलण्यासाठी अनेक आमदारांनी अहमदाबादमधील राष्ट्रीय अधिवेशनात वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन मागणी केली आहे. यामुळे काँग्रेस पक्ष लवकरच विधिमंडळ नेता बदलणार असून नवीन नेत्याची निवड केली जाणार आहे, अशी माहिती दिल्लीच्या नेत्यांनी दिली आहे.

विजय वड्डेटीवारांनंतर विधिमंडळ नेता कोण होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधिमंडळ पदाच्या शर्यतीत नाना पटोले, नितीन राऊत, विश्वजित कदम, अमीन पटेल आहेत.