जेएनएन, मुंबई: केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले.
शाह यांच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात सहकार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे.
सहकार क्षेत्रावर विशेष लक्ष
अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच सहकार मंत्रालयाचीही जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला नव्या पद्धतीने बळकटी देण्यावर भर दिला आहे. विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, सहकारी संस्था आणि कृषीशी संबंधित उद्योग यांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पतसंस्था आणि विविध सहकारी संस्थांचे मोठे जाळे राज्यात आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात सहकार क्षेत्राशी संबंधित विषयांना महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
उद्योग क्षेत्रासाठीही दौरा महत्त्वाचा
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने अमित शाह यांच्या दौऱ्यात उद्योग क्षेत्रातील विविध विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्योग, तंत्रज्ञान आणि नव्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
शिंदेंनी घेतली होती पीएम मोदींची भेट
अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पीएम मोदी यांची भेट घेतली होती. आता शाह मुंबईत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी शिंदे सेना आणि उद्धव ठाकरे सेना यांच्यात सुप्रीम कोर्टात सामना सुरु आहे. या प्रकरणाचा निकाल येत्या काळात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई दौऱ्यावर असलेल्या शाह आणि शिंदे यांच्या खलबतं होण्याची शक्यता आहे. यामध्ये आगामी रणनिती आणली जाण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील आठवड्यात परीसिमन विधेयक संसदेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळेही महाराष्ट्राच्या राजकीय दुष्टीकोनातून शाह यांचा दौरा विशेष असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -
