जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या (I.N.D.I.A. – Indian National Developmental Inclusive Alliance) बैठकीला उपस्थित राहणार आहेत.  लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना स्नेह भोजनाचा आमंत्रण दिले आहे.

दिल्लीत पार पडणाऱ्या  या बैठकीत आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीवर चर्चा करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीवर चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत एक एकजूटतेचा मुद्दा उपस्थित करणार आहे अशी माहिती ठाकरे गटाच्या नेत्यांने दिली आहे. देशातील विरोधी पक्षांची आघाडी भाजपविरोधात एकजूट दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील काही बैठकींमध्येही उद्धव ठाकरे यांनी सक्रिय सह घेतला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बैठकीला जाने पसंद केले नाही.  

उद्धव ठाकरे काही प्रमुख नेत्यांची भेट घेणार !

दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे काही प्रमुख नेत्यांची स्वतंत्र भेट घेणार आहे. यामध्ये शरद पवार, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सहीत अनेक प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहे.   

राहुल गांधी यांचे स्नेह भोजनाचे आमंत्रण! 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना स्नेह भोजनाचा आमंत्रण दिले आहे. स्नेह भोजन कार्यक्रमाला उबाटा गटाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहे.