जेएनएन, मुंबई: राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते डीबीटी मार्फत बँक खात्यात जमा केले आहे. या योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबर पासून 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे. महायुती सरकारने महिलांना स्वत:चा खर्च करता यावा यासाठी ही महत्वकांक्षी योजना सुरू केली आहे. राज्य सरकार कडून प्रती महिना 1500 रुपये थेट डीबीटी द्वारे खात्यात जमा केले जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा राज्यातील 100 टक्के महिलांना देण्याचा लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रममध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता डीबीटीद्वारे थेट खात्यात जमा केला जाणार आहे.