जेएनएन, बारामती/मुंबई: पवार कुटुंबाने नेतृत्वाच्या पुढील वाटचालीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याचा आणि सुनेत्रा अजित पवार यांना बारामतीतून आमदार बनवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.

माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, हा मूळ निर्णय पवार कुटुंबाचाच आहे. या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली असून, पुढील काही तासांत या घडामोडींना अधिकृत स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.

पवार कुटुंबाचा मास्टरप्लॅन
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पवार कुटुंबाने नियोजनबद्ध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

• पार्थ पवार यांना थेट राज्यसभेत पाठवून राष्ट्रीय पातळीवर राजकीय जबाबदारी देण्याचा विचार आहे.

• तर सुनेत्रा पवार यांना बारामतीतून विधानसभेत आणून राज्याच्या सत्ताकेंद्रात महत्त्वाची भूमिका देण्याचा निर्णय घेतला जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी निर्णायक चर्चा
माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पवार कुटुंबातील वरिष्ठांमध्ये या विषयावर चर्चा झाली.सुनेत्रा पवार यांना नेतृत्व सोपविण्यात येणार.बारामतीतील राजकीय समीकरणे स्थिर ठेवून सरकारमधील स्थैर्य ठेवण्यासहीत  सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

    भाजपकडूनही हिरवा कंदील
    भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही सुनेत्रा पवार यांच्या नावाला तत्त्वतः होकार दिल्याची माहिती आहे. यामुळे उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे मानले जात आहे. सरकारमधील सत्ता-संतुलन राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

    पुढील काही तास निर्णायक
    राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचाली सुरू असून,राज्यसभा उमेदवारी,बारामतीतील पोटनिवडणूक आणि मंत्रिमंडळातील फेरबदल याबाबत पुढील काही तासांत मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    अजित पवार यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीतून आता नवे नेतृत्व, नवी दिशा आणि नवे समीकरणे आकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

    हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार कोणता निर्णय घेणार होते? जवळच्या मित्राने सांगितले दादांची शेवटची इच्छा 

    हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट होणार होते विलीन, निश्चित झाली होती अंतिम तारीख; अजित पवारांच्या निधनानंतर अयशस्वी झाली ही योजना