जेएनएन, मुंबई: ठाणे पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी धडक कारवाई करत शिळफाटा परिसरातून तब्बल 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.ठाणे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, ठाणे गुन्हे शाखेला शिळफाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका वाहनाची झडती घेतली. यावेळी वाहनातून किलो-किलो पॅकेटमध्ये भरलेला गांजा सापडला. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जवळपास १ कोटीहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा: Ajit Pawar: अजित पवार गटाचा गुलाबी ‘इमेज बिल्डिंग’ प्लॅन; पुन्हा कोट्यवधींचा करार, शेतकरी मात्र हवादील!