जेएनएन, मुंबई: राज्यातील शेतकरी संकटात असताना अजित पवार यांचा ' इमेज बिल्डिंग'साठी कोट्यावधी रुपयांचा गुलाबी करार करण्यात आला आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खासगी ‘इमेज बिल्डिंग कंपनी’सोबत कोट्यवधींचा करार केल्याची माहिती समोर आली आहे.
डिझाईन बॉक्स नावाच्या या कंपनीसोबत यापूर्वी विधानसभा निवडणुकीत करार करण्यात आला होता. तेव्हाच पक्षाच्या प्रचार मोहिमेत गुलाबी रंगाचा वापर प्रकर्षाने दिसून आला होता.
या नव्या करारावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी हल्लाबोल करत म्हटले की, “शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी, लाडली बहिणींसाठी निधी देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र अजित पवारांना गुलाबी रंग चमकवण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत.”तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रवक्ते महेश तपासे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. “सरकारमध्ये असताना स्वतःच्या कामावर विश्वास नाही म्हणून अजित गटाला अशा कंपन्यांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, कर्जबाजारी होत आहेत आणि त्याचवेळी सत्ताधारी नेते स्वतःची इमेज चमकवण्यासाठी कोट्यवधी खर्च करत आहेत. यामध्ये पैसा नेमका कुठून येतो, याचीही चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी तपासे यांनी केली.
हेही वाचा:Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय!