जेएनएन, मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण देशभरात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम  पुढील काही दिवसांत कडाक्याची थंडी, अवकाळी पावसाचे प्रमाण आणि अचानक तापमान घट अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर भारतात बर्फवृष्टी आणि हिमवर्षावाचा अंदाज
पश्चिमी चक्रीय झंझावात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव उत्तर भारतात दिसून येतो आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हलक्या पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या बर्फवृष्टीमुळे येणाऱ्या शीत वाऱ्यांचा प्रभाव थेट मध्य आणि दक्षिण भारतापर्यंत पोहोचत असल्याचं IMD चे निरीक्षण आहे.

हिमालयातील वाऱ्यांचा महाराष्ट्रावर परिणाम
गेल्या चार दिवसांपासून हिमालयीन भागात झालेल्या तीव्र बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिणेकडे वाहू लागले आहेत. या शीत लहरींमुळे महाराष्ट्रातील हवामानातही मोठा बदल जाणवतो आहे.

उत्तर महाराष्ट्र, पुणे, नाशिक आणि कोकण विभागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

रविवारी मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेले होते,त्यामुळे हंगामातील सर्वात कमी तापमान आहे.

महाबळेश्वर, नाशिक आणि जळगावसारख्या भागांमध्ये तापमान 17 अंशांखाली गेले आहे.

    मुंबईत गुलाबी थंडीचा अनुभव
    मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरातही थंडीचा प्रभाव स्पष्ट जाणवू लागला आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढला असून, समुद्रकिनाऱ्याजवळील भागातही तापमानात घट जाणवते आहे.

    हेही वाचा: थंडीचा प्रकोप वाढणार! या 3 राज्यासाठी थंडीचा इशारा, दिल्लीसह उत्तर प्रदेश-बिहारमध्ये हवामान कसे राहील? जाणून घ्या