जेएनएन, मुंबई: पूजा खेडकर कुटुंबीयांच्या फरार प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. माजी आमदार दिलीप खेडकर यांचा ड्रायव्हर अखेर पोलिसांच्या ताब्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून दिलीप खेडकर आणि त्यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल साळुंखे फरार आहेत. पोलिसांनी या दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली. नवी मुंबई पोलिसांच्या तब्बल तीन टीम त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्या आहेत.
दरम्यान, दिलीप खेडकरच्या ड्रायव्हरकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसच्या माहितीनुसार, या ड्रायव्हरने खेडकरांच्या हालचालींबाबत काही ठसे दिल्यास फरार आरोपींचा मागोवा घेणे सोपे होऊ शकते. पूजा खेडकरच्या आईच्या घरावर अलीकडेच पोलिसांनी छापा टाकला होता, मात्र तेव्हा घरात कुणीही आढळून आले नाही. खेडकर कुटुंबीय अजूनही फरार असल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.