जेएनएन, मुंबई:आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूककडे  कमी लक्ष  आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकसाठी राजकीय पक्षाकडून जातीने लक्ष घातले जात आहे.आज सकाळपासून मतदार यादी अद्ययावत प्रक्रियेतील अंतिम टप्पा सुरू झाला. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध विभागांतून दुरुस्ती अर्जांचा मोठ्या प्रमाणावर ओघ वाढला आहे. यामध्ये नवीन मतदारांची नोंद, मृत मतदारांची नावे वगळणे आणि दुबार नावे हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष मोहीमेअंतर्गत अनेक नागरिक केंद्रांवर उपस्थित राहून मतदार यादीत नावाची तपासणी केली जात आहे.

दरम्यान प्रभाग रचना नंतर आज भारतीय जनता पक्षाने प्रभागवर बैठकीला सुरुवात केली आहे.यामध्ये भाजप प्रभाग रचनेनुसार कार्यकर्त्याला उमेवदवार निश्चित करण्यासाठी काही विशेष पॅरामिटर निश्चित केले आहे. तर उद्धव ठाकरे आपल्या जुन्या सैनिकासोबत आज विशेष चर्चा आयोजन केले आहे.

वाचूयात आज कोणत्या पक्षाने काय केले
भाजप पक्षाने मुंबई महानगर पालिका निवडणुकसाठी आज आपल्या कार्यकर्ता सोबत बैठक घेतली आहे. बैठकीत प्रभाग रचना आणि मतदार यादी अद्यावत करण्याचा प्रक्रियांमध्ये सहभाग घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरेचा मनसेला 70 जागेची ऑफर?
BMC निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 70 जागा देण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान दोन्ही पक्षाकडून प्रभाग स्तरावर जागावाटप आणि उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे.

उद्धव ठाकरेचा मास्टर स्ट्रोक
BMC निवडणुकसाठी उद्धव ठाकरे यांनी  ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे.जुने आणि परंपरागत ‘ज्येष्ठ शिवसैनिकला मदत करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे आज करणार आहे.

समाजवादी आणि MIM पक्षाची तयारी
समाजवादी पक्षाने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.आज पक्षाची प्रभाग रचनेनुसार बैठक पार पडली आहे.मुस्लिम बहुल मतदार संघात उमदेवारची चाचपणी केली आहे. सोबतच MIM पक्षाने मुस्लिम बहुल मतदार संघावर करडी नजर केली आहे. BMC निवडणुकीत MIM मुस्लिम बहुल मतदार संघात उमदेवार देण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर; शहरात 35 लाखांहून अधिक मतदारांची नोंद