जेएनएन, दापोली - कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रशिक्षणाने स्मार्ट ग्रामपंचायत करण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांनी सुरू केला आहे. “ग्रामप्रशासनासाठी तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना कार्यशाळा” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा उद्या (शनिवार) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून राजेश उपाध्याय,एडिटर-इन-चीफ, जागरण न्यू मीडिया, दिल्ली, मयंक शुक्ला सीनियर एडिटर, जागरण न्यू मीडिया, दिल्ली, उत्कर्ष द्विवेदी प्रोफेसर, MICA अहमदाबाद आणि विनोद राठोड डेप्टी एडिटर, जागरण न्यू मीडिया मुंबई हे सहभागी होणार आहेत.
या कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण प्रशासनाला तंत्रज्ञानाचा सक्षम वापर करून पारदर्शक आणि लोकाभिमुख बनविण्याचा प्रयत्न आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांना डिजिटल साधनांचा वापर करून प्रशासनिक कार्यप्रणाली सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत अधिकारी यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावांचा विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.