जेएनएन, मुंबई: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या झालेल्या भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवर आता ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ म्हणाले, “विखे पाटील जरांगेंना कोणत्या कारणाने भेटले, हे मला माहीत नाही. मात्र, जरांगे सातत्याने काहीतरी बोलत असतात. अलीकडेच त्यांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केली, अशा गोष्टी आम्ही करत नाही.” “ओबीसी समाजाबद्दल आम्ही शांततेने आणि कायदेशीर मार्गाने भूमिका मांडतो. कुणावर हल्ले करणे, धमक्या देणे हा आमचा मार्ग नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा कायदेशीर आणि संवैधानिक चौकटीत सोडवायला हवा.”
दरम्यान, विखे पाटील आणि जरांगे यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणांबद्दल नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुढील निर्णय प्रक्रियेत ही भेट कितपत प्रभाव टाकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: OBC Reservation: नागपूरमध्ये आज ओबीसी महामोर्चा; 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी!