जेएनएन, मुंबई. Nana Patole Writes to President: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र सरकारकडून अपमान केल्याप्रकरणात काँग्रेसचे आमदार नाना पाटोले यांनी भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु यांना पत्र लिहले आहे. पत्रात सांविधानिक पदावरील व्यक्तीच्या अपमान प्रकरणात राज्य सरकार आणि अधिकारीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नाना पटोले यांचा आरोप

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान जाणून बुजून केला आहे. भूषण गवई आंबेडकर विचाराचे असल्याने त्यांचा अपमान राज्य सरकार आणि अधिकाऱ्यांनी केला आहे, असा आरोप ही पटोले यांनी केला आहे.

ही अतिशय दु:ख देणारी कृती राज्य सरकारने केली

महाराष्ट्र सुपुत्र म्हणून सरन्यायाधीश यांचा मुंबईत सत्काराचा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात प्रोटोकॉलप्रमाणे राज्यातील महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना उपस्थित राहायला हवे होते. मात्र हे तीनही बडे अधिकारी त्या कार्यक्रमात गेले नाही. तर शेवटी सरन्यायाधीश यांनी भाषणमध्ये ही खंत बोलून दाखवली आहे, ही अतिशय दु:ख देणारी कृती राज्य सरकारने केली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा - डॉ. होमी भाभा यांच्यासोबत अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीनिवासन याचं निधन

    काय म्हणाले नाना पटोले

    महाराष्ट्र सरकारने संविधानिक पदावरील सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान केला आहे. हा अपमान महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीतील बहुजन भूषणचा अपमान केला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अपमान करणाऱ्या सरकार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मी आपणास विनंती करतो, असं ते त्यांनी पत्रात म्हटलं आहे.