जेएनएन, मुंबई. Municipal Council Election Date: राज्य निवडणूक आयोगाकडून 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 2 डिसेंबर 2025 रोजी यासाठी मतदान होईल तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत 1 कोटीहून अधिक मतदार मतदान करतील.
राज्यात 246 नगरपरिषदामध्ये 10 नव्या नगरपरिषदांचा समावेश आहे. राज्यामध्ये 147 नगरपंचायती आहेत. त्यापैकी 42 ची नगरपंचायती निवडणूक होत आहे. 6859 सदस्य, 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.
नगर परिषद-पंचायत निवडणूक सविस्तर कार्यक्रम
- नामनिर्देशन दाखल - 10 नोव्हेंबर
- नामनिर्देशन अंतिम तारीख- 17 नोव्हेंबर
- छाणणी - 18 नोव्हेंबर
- नामनिर्देशन वापस - 21 नोव्हेंबर
- नामनिर्देशन (अपिल) - 25 नोव्हेंबर
- निवडणूक चिन्ह - 26 नोव्हेंबर
- मतदान - 2 डिसेंबर
- मतमोजणी - 3 डिसेंबर
