मुंबई. नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईतही असेच आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा मार्ग एका महिलेने अडवल्याचे दिसून आले.
CJPच्या (कॉकरोच जनता पार्टी) आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनसमोर उभी राहिलेली रिया यादव ही तरुणी अचानक चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत.
दादरमधील शिवाजी पार्कजवळ सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान, रिया यादव नावाची एक महिला पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी राहून तिथून हटण्यास नकार देताना दिसली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ती हुडी आणि टोपी घालून मुसळधार पावसात व्हॅनचा मार्ग अडवताना दिसत आहे. तिच्या या धाडसी कृतीमुळे ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका होण्यास मदत झाली, असे वृत्त आहे.
बुधवारी दादर येथील शिवाजी पार्क, चैत्यभूमी, चेंबूर परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी मोठे प्रदर्शन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवले. तेव्हाच हुडी घातलेली एक तरुणी धावत आली आणि तिने चालत्या पोलिस व्हॅनसमोर उभे राहून गाडी रोखली. ती तिथून हटण्यास स्पष्ट नकार देत होती. तिच्या या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला.
हमारी छोरिया छोरो से कम नहीं,
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 23, 2026
मुंबई में लड़कियां भविष्य सुरक्षित करने के लिए संघर्ष करती हुई।#मुंबई pic.twitter.com/91fugfBFM3
जर पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, तर आम्ही ती पार पाडू.
तिने एका पत्रकाराला सांगितले, "पोलीस आपले काम जबाबदारीने करत नाहीत. जर त्यांनी ते केले नाही, तर आम्ही आमच्या नागरिकांची जबाबदारी स्वतः घेऊ." रियाने पुढे सांगितले की, ती विद्यार्थिनी नसली तरी त्यांच्या पाठीशी उभी आहे. रियाने सांगितले की, तिचे वडील शेतकरी नाहीत, तसेच ती एससी व ओबीसी समुदायाची नाही मात्र प्रश्न विद्यार्थ्यांचा व देशाच्या भविष्याचा असल्याने तिने आंदोलनात सहभाग घेतला आहे.
"परवा त्यांनी (दिल्ली पोलिसांनी) विद्यार्थ्यांसोबत जे केले ते चुकीचे होते," असे रिया म्हणाली. हजारो कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, लाठीचार्ज आणि दंडुक्यांचा वापर केल्याच्या घटनेचा संदर्भ देत ती हे बोलली.
हिम्मत मुंबईची…@Dev_Fadnavis आमची मुंबई मोदीं शहांच्या हुकुमशाहीला आता घाबरत नाही!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 22, 2026
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/aM5tHMkKAD
रिया यादव कोण आहे?
तिच्या इंस्टाग्राम बायो नुसार, रिया यादव एक अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 1,00,000 फॉलोअर्स आहेत आणि ती म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. ती शेवटची 'दिलबरा' नावाच्या व्हिडिओ गाण्यात दिसली होती. एक उद्योजिका म्हणून, ती हाताने कपडे तयार करते आणि 'रियासत' नावाचा तिचा स्वतःचा ब्रँड आहे.
