जेएनएन,नवी मुंबई: पनवेल ओरियन मॉलच्या मागच्या बाजूला असलेल्या गोडाऊन मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाच दिवसापूर्वी पोलिसांना मिळाला. मृतदेहाची ओळख अजूनही पटली नाही. तर प्रथम दर्शनी हा खून असल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सतत पाच दिवस तपास करूनही काहीच हाती लागले नसल्याने एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मयत व्यक्तीसोबत एक व्यक्ती जाताना आढळला,पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यानेच त्याला दोरीच्या सहाय्याने गळा आवळून मारल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपीच्या सांगण्यावरून त्यांची ओळख घटनेच्या दोन दिवस आधीच झाली होती. घटनेच्या दिवशी दोघेही एका बार मधून दारू पिऊन बाहेर आले होते. चालत असताना एका फुटपाथवर पुरी भाजीचा स्टॉलवर दोघांनी पुरी भाजी खाल्ली होती. मात्र बिल कोण देणार यावरून त्यांच्यात वाद झाला. शेवटी मृत व्यक्तीने बील भरले होते. मात्र वाद सुरूच राहिला, दोघेही ओरियन मॉल च्या मागे बाजूस गेले तिथेही वाद थांबला नाही. आरोपी धीरज राजू वर्मा याने मयत व्यक्तीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी आणि मयत व्यक्तीची ओळख घटनेच्या केवळ दोन तीन दिवसांचीच असल्याचे सांगितले जात आहे. तर दोघेही नाका कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी धीरज वर्मा याला पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी सुनावली असून,अधिक तपास आणि मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस करत आहेत.
By: AuthorEdited By: Vinod RathodPublish Date: Tue 24 Sep 2024 06:03:15 PM (IST)Updated Date: Tue 24 Sep 2024 06:03:18 PM (IST)
