जेएनएन, मुंबई. Mumbai Fire Update: मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा परिसरात एका फर्निचरच्या गोदामाला आग लागली आहे. या घटनेत किमान दहा दुकाने जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई अग्निशमन विभागाने माहिती दिली आहे की, सुदैवाने या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. लोकांनी आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

व्हिडिओमध्ये फर्निचरच्या गोदामातून धुराचे काळे लोट आकाशात उडत असल्याचे दिसत आहे. आगीची भीषणताही व्हिडिओत दिसत आहे. अग्निशमन विभाग आग विझविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

दुसऱ्या एका घटनेत नवी मुंबईतील तुर्भे हनुमान नगर मधील डम्पिंग ग्राउंडला लाग लागली आहे. अचानक लागलेल्या आगीचे लोळ आकाशात मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    आग विझवण्याचा प्रयत्न सुरु

    घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. आग पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.

    हेही वाचा - 'तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जात नाहीत, त्यांचे स्वरूप बदलते': पॅरिसमध्ये AI मुळे नोकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य