जेएनएन, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 90 टक्के उमेदवार युवक असतील. कॉँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत 30 ते 45 वयाचे युवकांना उमेदवारी देणार असल्याची माहिती महाराष्ट्र कॉँग्रेस कामिटीचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली आहे.
मराठी जागरणच्या लोकार्पण कार्यक्रममध्ये पाटोले यांनी ही माहिती दिली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून कॉँग्रेस पक्ष युवकांना राजकारणात मोठी संधी देणार असल्याचे पाटोले यांनी सांगितले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांना राजकारणात संधी देऊन देशातील अर्थव्यवस्था आणि विकासाला गती द्यायची आहे. भारतीय अर्थव्यवस्था आणि विकास युवकांच्या हातात द्यायचा आहे असे पटोले यांनी सांगितले. राज्यात कॉँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून लढेल असे पाटोले यांनी सांगितले. कॉग्रेस पक्षांकडून जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा मित्र पक्षांशी सुरू आहे. काही जागेवर तोडगा लवकरच निघेल अशी माहिती पाटोले यांनी दिली आहे. नाना पाटोले यांनी मराठी जागरण डिजिटलच्या पोर्टलला भविष्याच्या वाटचालीला मनापासुन शुभेच्छा दिल्या.
जागरण न्यू मीडिया
जागरण न्यू मीडिया ही जागरण प्रकाशन लिमिटेडची डिजिटल शाखा आहे, प्रिंट, ओओएच, ॲक्टिव्हेशन, रेडिओ आणि डिजिटल माध्यमांमध्ये पसरलेला भारतातील आघाडीचा मीडिया ग्रुप. जागरण न्यू मीडियाची 97.5 दशलक्षाहून अधिक वापरकर्त्यांची पोहोच आहे (comScore MMX मल्टी-प्लॅटफॉर्म; मार्च 2024). जागरण न्यू मीडियाने भारतातील शीर्ष 10 बातम्या आणि माहिती प्रकाशकांमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. कंपनी दररोज 8000 पेक्षा जास्त बातम्या आणि 60 व्हिडिओंसह मल्टीमीडिया सामग्री प्रकाशित करते.
जेएनएमकडे मीडिया आणि प्रकाशन श्रेणी अंतर्गत विविध प्रकारचे पोर्टल आहेत. सर्व शैलींमध्ये रीअल-टाइम सामग्री वितरीत करण्यातही ते अग्रणी आहे. यात बातम्या आणि राजकारण मुख्य आहे. याशिवाय शिक्षण, लाईफस्टाईल, आरोग्य, ऑटो आणि टेक्नोलॉजी यांचाही मोठा वाटा आहे. JNM ने बातम्या, राजकारण आणि इतर विषय कव्हर करणारी वेबसाइट समर्पित केली आहे. यामध्ये jagran.com , naidunia.com , inextlive.com , punjabijagran.com आणि gujaratijagran.com समावेश आहे. एक अग्रगण्य आरोग्य वेबसाइट Onlymyhealth.com , एक महिला-केंद्रित पोर्टल Herzindagi.com आणि वेबसाइट करिअर आणि शिक्षणावर केंद्रित आहे JagranJosh.com , अग्रगण्य तथ्य तपासणी वेबसाइट Vishvasnews.com हे जागरण न्यू मीडियाचाही महत्त्वाचा भाग आहे.