जेएनएन, मुंबई. Maharashtra Politics: शिवसेना (यूबीटी) चे आमदार (विधान परिषद) सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा झटका

मागील काही दिवसांत ऑपरेशन टायगर करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. यानंतर आता शिंदे यांनी ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. विधान परिषदेतील सदस्य असलेले सचिन अहिर यांना त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहे. 

सचिन अहिर यांना उपसभापतीपदाची उमेदवारी

सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करताच त्यांना विधान परिषदेतील उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. ही उमेदवारी दाखल करताना माजी उपसभापती निलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार उपस्थित होते. सचिन अहिर हे ठाकरे कुटूंबियांचे अत्यंत जवळचे नेते मानले जात होते.

या सहा खासदारांचा शिवसेनेत प्रवेश

     खासदार संजय जाधव, संजय देशमुख, संजय दिना पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांनी  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. आता सचिन अहिर हेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.