जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे अनेक भागांमध्ये उकाडा आणि दमट वातावरण वाढले असून तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  

मात्र, ‘महाराष्ट्रात तापमान ४७अंश सेल्सिअसपर्यंत जाणार’ असा दावा करण्यात येत आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) उपलब्ध अंदाजानुसार, राज्यात पावसाचा काही भागात ब्रेक राहू शकतो आणि त्यामुळे उष्णता व दमटपणा वाढू शकतो, तर ४७ अंश तापमान वाढू शकतो असा इशारा देण्यात आला आहे .  

पावसाची स्थिती काय?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत कोकणात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. काही भागांत तुरळक सरी पडतील, तर काही ठिकाणी उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

तापमान का वाढत आहे?
पावसाचा जोर कमी झाल्यानंतर ढगांचे प्रमाण घटते आणि सूर्यप्रकाश वाढतो. त्याचबरोबर हवेत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा अधिक जाणवतो. त्यामुळे प्रत्यक्ष तापमान फार वाढले नसले तरी ‘फील्स लाइक’ (जाणवणारे तापमान) अधिक असू शकते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी

* दुपारच्या वेळेत शक्यतो थेट उन्हात जाणे टाळावे.

    * पुरेसे पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.

    * हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा.

    * शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाजानुसार शेतीची कामे नियोजित करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

    हेही वाचा: ‘अल निनो’चा प्रभाव वाढतोय? महाराष्ट्रात मान्सून पुन्हा मंदावला; शेतकऱ्यांची चिंता वाढली