जेएनएन, मुंबई: रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच पुणे घाट व सातारा घाट या भागात आज रेड अलर्ट (Red Alert in Maharashtra) दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने मुंबई शहर व मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 25 जुलै रोजी सायं.05.30 पासून ते 27 जुलै 2025 रोजी रात्री 08.30 वाजेपर्यंत 4.1 ते 4.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदी दुथडी भरून वाहत आहे, ज्यामुळे भरमरागड तहसीलचा गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

  • येलो अलर्ट - धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
  • रेल अलर्ट - रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच पुणे घाट, नाशिक घाट व 
  • ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, नागपूर, वर्धा,

हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यात रेड अलर्ट जारी, या भागात अतिवृष्टीची शक्यता 

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता 

    मुंबईत आज सकाळी मुसळधार पाऊस (Heavy rain in Mumbai) पडला, त्यामुळे वाहनांची वाहतूक मंदावली आणि पश्चिम रेल्वेवरील काही उपनगरीय रेल्वे सेवांवर परिणाम झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिवसाच्या उत्तरार्धात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत महानगरात "मुसळधार ते अति मुसळधार" पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे पोलिसांनी जनतेला बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.