जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain Alert: राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. अनेक भागात उन्हाचे चटके बसत आहेत. यातच आता महाराष्ट्रात काही भागात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशार दिला आहे. तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
15 मार्च रोजी अकोला, अमरावती भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
तर कोल्हापूर (घाटांसह), सातारा (घाटांसह), सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितला आहे.
पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज
16-03-2026
कोल्हापूर (घाटांसह), सातारा (घाटांसह), सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ
17-03-2026
छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ
18-03-2026
नांदेड, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, वर्धा
