जेएनएन, मुंबई. राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात परतीच्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. येत्या 5 दिवसात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातच आता हवामान विभागाने आज राज्यात येलो अलर्ट जाहीर केला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आज अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उद्या ऑरेंज अर्लट

उद्या म्हणजेच दि. 27रोजी नांदेड, लातुर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर व उपनगर, पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापुर घाट या जिल्हांना ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती

1. सीना नदी वडकबाळ येथे धोका पातळीच्या वर वाहत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर येथे NDRF चे 2 पथक अद्याप तैनात आहे. 

    2. भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्या वर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या पुर्व सुचना देण्यात आल्या आहेत.

    गडचिरोली जिल्ह्यातील पावसाची स्थिती

    • गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे आलापल्ली ते भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130 डी वरील भामरागड पर्लकोट दरम्यानचा वाहतुकीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भामरागड येथे सुरक्षेच्या दृष्टीने SDRF पथक तैनात करण्यात आले आहे.
    • सद्यस्थितीत हेमलकसा ते लाहेरी या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच आवश्यक त्या खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

    नांदेड जिल्ह्यातील पावसाची स्थिती

    • गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्याप्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला होता. त्या अनुषंगाने नागरिकांना सतर्कतेच्या पुर्व सुचना देण्यात आल्या आहेत.
    • नांदेड शहर परिसरातील नांदेड जुनापूल येथे गोदावरी नदी धोका पातळीवर वाहत असल्याने संभाव्य पुर परिस्थीती लक्षात घेता नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते.

    हेही वाचा - Maharashtra Weather Update: चिंता वाढली! पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, पाहा तुमच्या भागातील हवामान