जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात नागरिक हे उष्णतेने हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचेही आवाहन IMD ने केले आहे. तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा पिवळा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान हे 45 अंशांच्या पार गेले आहे.
- छत्रपती संभाजीनगर
- जालना
- परभणी
- बीड
- हिंगोली
- नांदेड
- अकोला
- अमरावती
- नागपूर (काही भागांत)
- वर्धा (काही भागांत)
मुसळधार पावसाचा इशारा असलेली जिल्हे
विदर्भात उष्णतेचा पारा चांगला तापला आहे. अकोला, अमरावती भागात 46 अंशांच्यावर गेला आहे. आताच आता पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- चंद्रपूर
- गडचिरोली
- गोंदिया
- नागपूर (काही भागांत)
- वर्धा (काही भागांत)
- यवतमाळ
हेही वाचा - 'झुबेरला हिंदूंना लक्ष्य करायचे होते', मुंबईतील सुरक्षारक्षकांवरील हल्ल्यावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

उष्माघाताच्या प्रतिबंधासाठी काय करावे आणि काय करू नये?
जर तुम्हाला किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणाला उष्माघाताची लक्षणे जाणवत असतील, तर तात्काळ पुढील उपाययोजना करा:
- बाधित व्यक्तीला ताबडतोब सावलीच्या किंवा थंड ठिकाणी हलवा.
- पाणी किंवा ओआरएस द्रावण पिऊन शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवा.
- अल्कोहोल, कॅफीन आणि वायूयुक्त शीतपेये टाळा.
- चेहऱ्यावर ओला कपडा ठेवा आणि हवा खेळती राहण्यासाठी कपडे सैल घाला.
हेही वाचा - Maharashtra Board HSC Result 2026: बारावीचा निकाल कधी लागणार? महत्त्वाची अपडेट आली समोर
