जेएनएन, मुंंबई. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पाऊस थांबल्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. त्यामुळे अनेक भागात उन्ह्याचा तडाखा वाढला असून नागरिकांना उकाड्याचा सहन करावा लागत आहे. दुपारच्या सुमारास प्रखर ऊन पडत असल्याने अंगावर तापमानाचा ताण जाणवत आहे.तर काही ठिकाणी ढग दाटले आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हलक्या सरींमुळे उकाड्यातून आंशिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरपासून पाऊस थांबल्याने शेतांतील पिकांची वाढ होत आहे, तर काही ठिकाणी पाणी कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुन्हा काही ठिकाणी पावसाची हजेरी लागल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोकण आणि मुंबई परिसरात अजूनही पावसाची शक्यता नसल्याने उकाडा आणि उष्णतेचा त्रास कायम राहणार आहे.