जेएनएन, मुंबई: राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह मध्य महाराष्ट्राच्या जिल्ह्यांसाठी पुढील काही दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain Alert in Mumbai) दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

कोकण आणि उर्वरित महाराष्ट्राला इशारा

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण व मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ व मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन जिल्हातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर आज आणि उद्या दोन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. 

या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालघरचे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून, पुराचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. शाळेकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा पाऊल उचलले असून, पालकांनी देखील सावधगिरी बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

    जिल्ह्यात पाणीच पाणी 

    राज्यातील अनेक जिल्ह्यांत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणीच पाणी भरले आहे. मुंबई, ठाण्यात खालच्या भागात पाणी साचले आहे. पालघर व रायगड जिल्ह्यात आधीच अनेक गावे पाण्याखाली गेली आहे.

    प्रशासनाचे आवाहन

    • नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये.
    • आपत्कालीन क्रमांकांवर सतत संपर्कात राहावे.
    • मच्छीमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा कडक इशारा.
    • शाळा व शिक्षण संस्था बंद ठेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्राधान्य देण्यात आले आहे.

    राज्यात आज पावसाचा अलर्ट असलेली जिल्हे

    • येलो अलर्ट - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर घाट, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर,  
    • ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, 

    हेही वाचा - Rain Alert in Mumbai: मुंबईत अतिमुसळधार पाऊस; लोकल ट्रेन उशिराने, 'ऑरेंज अलर्ट' जारी