जेएनएन, मुंबई: राज्यात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याची पिके वाहून गेली आहेत.
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरीला हेक्टरी 70 हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले
मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 17 जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.
हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.
शेतकऱ्यांची मदत केली जावे
राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली जावे अशी मागणी पटोले यांनी केली आहे. जीवितहानी झालेल्या कुटुंबियांना सहानुभूती म्हणून मदत करावी करावी अशी पटोले यांनी केली आहे.