जेएनएन, मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची उचलबांगडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडील कृषी मंत्रालयाचा कारभार हा मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मकरंद पाटील यांच्याकडे कृषीमंत्री पद!

पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधिमंडळात रम्मी खेळतानाचा कथीत व्हिडिओ हा आमदार रोहित पवार यांनी माध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर, कृषीमंत्री कोकाटे हे वादाच्या घेऱ्यात अडकले होते. यानंतर आज अशी माहिती समोर आली आहे. की त्यांच्याकडून कृषीमंत्रालयाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. आता नवीन कृषीमंत्री हे मकरंद पाटील हे असतील अशी सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर मदत पुनर्वसन विभागाचा पदभार कोकाटेंकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.