जेएनएन, मुंबई: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील नोंदणी केलेल्या 884 ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांपैकी केवळ 140 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्यात आली. त्यामुळे उर्वरित राहिलेल्या 744 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी तात्काळ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात केली.

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून मागणी

मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज आमदार पंकज भुजबळ यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला.  

शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करा 

या प्रश्नात आमदार पंकज भुजबळ यांनी म्हटले आहे की, अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील  पंजाबराव देशमुख खरेदी-विक्री संस्थेअंतर्गत ज्वारी खरेदी प्रक्रिया अचानक थांबवण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या 884 शेतकऱ्यांपैकी 140 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली आहे. 

यामुळे नोंदणी केलेले 744 शेतकरी अजूनही आपल्या ज्वारीसह प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात गोडाऊनच्या जागेचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करून उर्वरित 744 शेतकरी बांधवांची ज्वारी खरेदी करावी अशी मागणी आ.पंकज भुजबळ यांनी सभागृहात केली.