जेएनएन, मुंबई. राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातच आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बोलताना वेगळाचा किस्सा घडला आहे. यावर आता जोरदार चर्चा होत आहे. फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्या आधीच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभागृहाबाहेर भेट झाली होती.
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप
देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले की, ‘उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.’
Watch: Maharashtra CM Devendra Fadnavis to Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray says, "There is no scope of us going in opposition until 2029, but you can come here and we can figure out something"
— IANS (@ians_india) July 16, 2025
(Video Source: Maharashtra Vidhan Parishad) pic.twitter.com/hbR7nRRdNL
अंबादास दानवे कट्टर हिंदुत्ववादी
पुढे बोलताना "अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादीही आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत." असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.