जेएनएन, मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.राज्यात आज सर्वच पक्ष आणि पक्षाच्या उमेदवारला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीसाठी आतापर्यंत 637 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 40 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत.

  • शेवटच्या दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता
    आज अखेरचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या अर्ज फायलिंगसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.
  • स्थानिक पातळीवरील अनेक दिग्गजांनी आजच नामांकन दाखल करण्याची रणनीती आखली आहे.
  • तहसील कार्यालये, नगरपरिषद इमारती आणि निवडणूक कक्षांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
  • उमेदवारांच्या शिष्टमंडळे, समर्थकांची मानवी साखळी, ढोल-ताशांच्या वाजतगाजत होणारे मोर्चे यामुळे वातावरण अधिकच रंगतदार होणार आहे.

यवतमाळ जिल्हातील प्रमुख नगरपरिषदांमध्ये उत्सुकता

जिल्ह्यातील दहा नगरपरिषद —

यवतमाळ, पांढरकवडा, उमरखेड, दारव्हा, धनोडा, घाटंजी, महागाव, अरणी, कळंब आणि राळेगाव —

तसेच एक नगरपंचायत मिळून निवडणुकीचे समीकरण अतिशय रंगले आहे.

प्रत्येक ठिकाणी प्रमुख पक्ष भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट), शिवसेना (शिंदे-ठाकरे), बसपा, वंचित बहुजन आघाडी आणि स्थानिक पॅनेल जोरदार तयारीत आहेत.