जेएनएन, मुंबई. Lalbaugcha Raja Visarjan: मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा हा देशभरातील भाविकांसाठी लक्षणीय सोहळा असतो. मुंबईचा राजा, परळचा महाराजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होत. मुंबईत सद्याही विसर्जन मिरवणुका सुरूच आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन सुरू आहे. चिंतामणी गणपती विसर्जनासाठी येथे पोहोचला आहे. तर लालबागचा राजा हा ऑपेरा हाऊस परिसरात पोहोचला आहे. 

लालबागचा राजा लाईव्ह दर्शन

‘लालबागचा राजा’चा कुठे पोहोचला?

मुंबईतील लालबागच्या राजाची शुक्रवारी दुपारी विसर्जन मिरवणूक सुरू झाली होती, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी साडे आठ वाजता लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचली आहे. या ठिकाणी हार घालून लालबागच्या राजाचं स्वागत करण्यात आलं.

‘लालबागचा राजा’चा विसर्जन कधी?

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून थोड्याच वेळात लालबागचा राजा गिरगांव चौपाटीवर विसर्जनासाठी दाखल होणार आहे. सकाळी नऊ वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन होण्याची शक्यता आहे.

    गिरगांव चौपाटीवर मोठी गर्दी

    ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात लालबागचा राजा ला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविकांचा जनसागर लोटला आहे. गणेशभक्तांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली असून परिसरात उत्साहाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत शेकडो गणेशमूर्तींचे निर्विघ्नपणे विसर्जन मुंबईत पार पडले आहे.

    चिंतामणी विसर्जनासाठी पोहोचला

    मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जन सुरू आहे. चिंतामणी गणपती विसर्जनासाठी येथे पोहोचला आहे.