जेएनएन, मुंबई. Happy Republic Day 2026 Wishes: प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 (Republic Day 2026) रोजी भारताने आपले संविधान स्वीकारून लोकशाही राष्ट्र म्हणून नवी ओळख निर्माण केली.

26 जानेवारी हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शहिदांच्या त्यागाची आठवण करून देतो आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांबरोबरच कर्तव्यांचीही जाणीव करून देतो. विविधतेत एकता ही भारताची खरी ताकद असून ती जपण्याची जबाबदारी आपली आहे. 

प्रजासत्ताक दिन 2026निमित्त (Happy Republic Day 2026) दिलेले हे मराठी शुभेच्छा संदेश देशप्रेम, एकता आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा देतील. 

प्रजासत्ताक दिन 2026 साठी मराठी शुभेच्छा संदेश

  1. संविधानाने दिलेली समानता जपूया,
    कर्तव्यांतूनच खरे स्वातंत्र्य जपूया
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. लोकशाही ही केवळ व्यवस्था नाही,
    ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे।
    प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  1. तिरंग्याच्या प्रत्येक रंगात
    त्याग, शौर्य आणि आशा दडलेली आहे।
    प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
  1. संविधानाने दिले हक्क अमूल्य,
    कर्तव्यांची जपणूक हेच खरे राष्ट्रप्रेम।
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  2. तिरंग्यात सामावलेले स्वप्न आहे आपले,
    एकता, समता, बंधुता हेच बळ देशाचे।
    प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
  3. देश मजबूत होतो तेव्हा
    नागरिक जागरूक असतात।
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  1. एक विचार, एक संविधान,
    असंख्य स्वप्नांचा भारत।
    प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
  1. लोकशाहीचा अभिमान बाळगूया,
    संविधानाचा सन्मान राखूया।
    प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
  2. विविधतेत एकता जपणारा भारत,
    हेच आमचे सामर्थ्य, हीच आमची ओळख।
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  3. देशासाठी विचार, देशासाठी आचार,
    हीच खरी प्रजासत्ताक दिनाची शपथ।
    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन शुभेच्छा व्हॉटस्अॅप स्टेटस आणि कोटस्

  • बलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या आपण नतमस्तक होऊ, ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहतो आहे, नशीबवान आहे हे रक्त, जे देशाच्या कामी आलं आहे, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र, बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
  • आपण भारतीय आहोत याचा नेहमीच अभिमान असायला हवा कारण या अद्भुत देशात जन्म घेण्याचा सन्मान आणि विशेषाधिकार प्रत्येकाला मिळत नाही. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
  • आपल्या देशाचा सुवर्ण वारसा लक्षात ठेवूया भारताचा एक भाग असल्याचा अभिमान वाटू द्या. प्रजासत्ताक दिन 2025 च्या खूप खूप शुभेच्छा!
  • मुक्त आमचे आकाश सारे झुलती.. हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी.. आनंद आज उरी नांदे.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि कोटस्

    1. स्वातंत्र्य म्हणजे अधिकारांसोबत, कर्तव्यांची जाणीव, चला, दोन्ही निभावूया प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026
    1. भारत माझा श्वास आहे, माझा विश्वास आहे, आणि माझं सर्वस्व आहे, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026
    1. एक छोटं चांगलं कामही देशासाठी केलं, तर तीच खरी देशसेवा आहे. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026 
    1. भारताच्या प्रगतीत आपलाही वाटा असावा, हीच खरी देशभक्ती. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026
    1. जय हिंद म्हणताना छाती अभिमानाने फुलते, कारण आपण भारतीय आहोत, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026 
    1. देशासाठी जगणं, देशासाठी विचार करणं आणि देशासाठी कृती करणं हाच खरा देशभक्तीचा मार्ग. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Republic Day 2026

    हेही वाचा - Republic Day 2026 Parade: परेडचे थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहायचे? वाचा सविस्तर