Gudi Padwa 2026 LIVE Update: आज गुढीपाडवा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. गुढी पाडवा आणि हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने आज मुंबई, पुणे ठाण्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरात शोभा यात्रा निघणार आहेत. त्याचबरोबर महिलांच्या बाईक रॅली, ढोल-ताशांचे स्वर यामुळे सर्व वातावरणात एक वेगळाच जोश व उत्साह संचारला आहे. या शोभा यात्रांच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीच प्रदर्शन केलं जाणार आहे. विविध सामाजिक विषय मांडले जातात. अनेक मराठी अभिनेत्रींही शोभा यात्रेत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय आज संध्याकाळी दादार शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सालाबादप्रमाणे गुढीपाडवा मेळावा होणार आहे.
- 2026-03-19 17:00:00
Share Market: गुढी पाडव्यादिवशीच शेअर मार्केटमध्ये भूकंप; सेन्सेक्स-निफ्टीची मोठी घसरण
भारतीय बाजार गुरुवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. मध्य-पूर्वेतील संकट, जागतिक स्तरावर जोखीम टाळण्याची प्रवृत्ती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे दोन्ही बेंचमार्क इंडेक्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. सेन्सेक्स 2,497 अंकांनी घसरून 74,207 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 776 अंकांनी घसरून 23,000 च्या पातळीजवळ 23,002 अंकांवर बंद झाला. - 2026-03-19 14:55:00
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात शोभायात्रेत सहभागी, सई ताम्हणकरचीही उपस्थिती
गुढीपाडव्यानिमित्त नागपूरमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री सई ताम्हणकर हे सहभागी झाले होते.#WATCH | Nagpur: Maharashtra: Marathi actress Sai Tamhankar also joined the Gudi Padwa festivities alongside Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis. https://t.co/GtlmCsauDM pic.twitter.com/AP2CdAAeUx
— ANI (@ANI) March 19, 2026 - 2026-03-19 14:25:00
गिरगावात भव्य शोभायात्रा, उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगाव येथे गुढीपाडवा पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि चैतन्यमय मिरवणुकांच्या सोबतीने साजरा केला जात आहे. गिरगावात शोभायात्रांच्या निमित्ताने मोठा उत्साह बघायला मिळत आहे. रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या असून, ढोल-ताशाच्या तालावर लेझीम खेळत, तसेच देखावे सादर करत आहेत.Mumbai, Maharashtra: Gudi Padwa is being celebrated in Girgaon, Mumbai with traditional enthusiasm, dhol-tasha beats, and lively processions pic.twitter.com/n5QZTfASxZ
— IANS (@ians_india) March 19, 2026 - 2026-03-19 14:00:00
Gudi Padwa: एकनाथ शिंदेंकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
📍 #ठाणे |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 19, 2026
साखरेच्या गाठी अन् कडुलिंबाचा पाला,
सण हा मांगल्याचा दारी आला...
समृद्धीची गुढी गगनाला भिडू दे,
दुःख जीवनातील कायमचे सरू दे...
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने आज ठाण्यातील सांस्कृतिक परंपरेनुसार कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि… pic.twitter.com/BCPkY8m23Y - 2026-03-19 13:50:00
Eknath Shinde Gudi Padwa 2026: ठाण्यातील गुढीपाडवा शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाणे येथे आयोजित गुढीपाडव्याच्या उत्सवात सहभाग घेतला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 19, 2026
- 2026-03-19 13:40:00
Gudi Padwa 2026: अभिनेत्री अमृता राव ठाण्यातील गुढीपाडवा उत्सवात सहभागी
पारंपारिक मराठी वेशभूषेत सजलेली अभिनेत्री अमृता राव हिनेही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या उत्सवाचा भव्य विस्तार पाहून तिने आपला आनंद व्यक्त केला. "इतरत्र कुठेही मी असा वाखाणण्याजोगा उत्साह कधीच पाहिला नाही. ठाण्यातील तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही घटकांचा सहभाग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे," असे तिने पत्रकारांना सांगितले. - 2026-03-19 13:30:00
Gudi Padwa 2026: गिरगावमध्ये भव्य शोभायात्रा
गिरगावच्या प्रमुख भागांतून शोभायात्रा काढली गेली. सहभागींनी चमकदार वस्त्रे, कडुलिंबाची पाने, माळा आणि उलटा कलश यांनी सजवलेल्या गुढ्या हाती घेतल्या होत्या; या गुढ्या विजय, समृद्धी आणि सुभाग्याचे प्रतीक होत्या. घरांच्या छतांवर आणि मिरवणुकीच्या मार्गावर डोलणाऱ्या या गुढ्यांच्या दृश्यामुळे परिसराला एक आगळेच उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी महिलाचे ढोल ताशा पथक सर्वांचे लक्ष वधून घेत होते. - 2026-03-19 13:00:00
Gudi Padwa 2026: सोन्याचा भाव, दर वाढल्याने पाडव्याच्या ताटातून आमरस बाहेर
गुढीपाडव्याला वर्षातील आंब्याची पहिली चव चाखण्याची परंपरा असते. मात्र यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याचा दर कडाडला आहे. हवामानातील बदल, थंडीचा परिणाम आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली असून बाजारात आवक कमी झाल्याने दरात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणातील हापूसचा दर 3000 ते 9000 रुपये डझन झाला आहे.
- 2026-03-19 12:30:00
साई, सिद्धीविनायक मंदिरात गुडीपाडव्याचा उत्साह
शिर्डीच्या साई मंदिरात आज गुडीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे… पाडवा आणि मराठी नव वर्षाच्या निमित्ताने भाविकांची साईदर्शनासाठी गर्दी दिसुन येत आहे.साई मंदिरात आज आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असुन साई मुर्तीला कोटयवधींच्या सुवर्ण अलंकारासह साखरेच्या गाठीकडयांचे माळ परिधान करण्यात आले आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर तसेच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही मराठी नववर्षानिमित्त भाविकांची गर्दी दिसून येत आहे. - 2026-03-19 12:00:00
Raj Thackeray gudi padwa rally: राज ठाकरेंनी शेअर केला अंगावर शहारे आणणारा VIDEO
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर आज गुढी पाडवा मेळावा होणार आहे, शिवसेना ठाकरे गटासोबत जुळवून घेतल्यानंतर राज ठाकरेंचा पहिलाच पाडवा मेळावा होत असल्याने या मेळाव्यात ते काय बोलणार? याची राज्यातील जनतेला उत्सुकता असतानाच राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक विशेष व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र पुढचा (Maharashtra-Next) हे नवे अभियान या माध्यमातून जाहीर केले आहे.#MaharashtraNext#महाराष्ट्र_पुढचा pic.twitter.com/ljF6oZSwGJ
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2026 - 2026-03-19 11:30:00
Gudi Padwa 2026: शरद पवारांकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शरद पवारांनी पोस्ट केली आहे की, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे मराठी नववर्ष आपल्याला नव्या सुरुवातीची प्रेरणा देते. गुढी उभारण्याची परंपरा विजय, समृद्धी आणि मंगलमय जीवनाचे प्रतीक मानली जाते. नव्या वर्षात सकारात्मक विचार, परिश्रम आणि एकतेच्या बळावर प्रगतीचा मार्ग खुला करूया. गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे मराठी नववर्ष आपल्याला नव्या सुरुवातीची प्रेरणा देते. गुढी उभारण्याची परंपरा विजय, समृद्धी आणि मंगलमय जीवनाचे प्रतीक मानली जाते. नव्या वर्षात सकारात्मक विचार, परिश्रम आणि एकतेच्या बळावर प्रगतीचा मार्ग खुला करूया. गुढीपाडवा व मराठी… pic.twitter.com/yrgfjbnYC4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 19, 2026 - 2026-03-19 11:00:00
Gudi Padwa Gold Silver Price: गुढीपाडव्याच्या दिवशीच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
आज शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीलाच 1,700 अंकांनी, तर एनएसई 500 हून अधिक अंकांनी घसरला. शेअर बाजारासोबतच आज सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price Crash) दरातही मोठी घसरण झाली. सकाळी सुमारे 9:51 वाजता, चांदीच्या दरात (Silver Price Today) प्रति किलो जवळपास 5,000 रुपयांची आणि सोन्याच्या दरात (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांपेक्षा जास्त घसरण झाली. - 2026-03-19 10:30:00
Gudi Padwa 2026 : राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उभारली गुढी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर गुढी उभारण्यात आली आहे. राज ठाकरेंसह कुटुंबीयांकडून गुढीची पूजा करण्यात आली. मुंबईत आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेचा हा पहिलाच मेळावा असेल.आपणा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/7Bva4b4itr
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2026 - 2026-03-19 10:00:00
Narendra Modi Best wishes on Gudi Padwa: पंतप्रधान मोदींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा
गुढी पाडव्याच्या या उत्साही सणाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा सुंदर सण तवीन वर्षाच्या आगमनाचे प्रतीक असून नवचैतन्य,आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो.Best wishes on Gudi Padwa! pic.twitter.com/HHLzUXFYrQ
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2026 - 2026-03-19 09:30:00
Gudi Padwa 2026: मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी – देवेंद्र फडणवीस
दरवर्षी प्रमाणे आपण आपलं नववर्ष साजरे करण्यासाठी आलो आहे. हा आपल्यासाठी मोठा उत्सव आहे. नवसंकल्प घेऊन आता पुढे जाऊ. पारंपरिक वेषात आपण येतात आणि या ठिकाणी भगवामय वातावरण झालं. ही गुढी भारताची गुढी आहे. मोदींजीच्या नेतृत्वात ही गुढी अशीच पुढे जात राहावी अशा शुभेच्छा देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.Wishing everyone a blessed Gudi Padwa!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2026
May this new year bring prosperity to every home and lead Maharashtra towards greater progress and collective growth.
चला, मराठी नववर्षाच्या शुभारंभाचा सण साजरा करूया, सकारात्मक व परिवर्तनशील मार्गाने महाराष्ट्राच्या उन्नतीची गुढी उभारूया!… pic.twitter.com/e0EOFOCPP1 - 2026-03-19 09:00:00
Gudi Padwa 2026: गुढीपाडव्याची सार्वजनिक सुट्टी आहे की नाही?
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा सण येत आहे. यादिवशीही म्हणजेच 19 मार्च 2026 रोजी सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली आहे. यादिवशी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निम शासकीय खाजगी कार्यालये हे बंद राहतील. तसंच, या दिवशी सर्व शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी असेल.
