मुंबई. Gudi Padwa Girgaon Shobhayatra Viral Video: मराठी नववर्ष व गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2026) शुभमुहूर्तावर मुंबई-पुण्यासह राज्यातील अन्य शहरात भव्य शोभायात्रा काढल्या जातात. त्यात मुबईतील गिरगावात काढलेल्या शोभा यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक तरुण-तरुणी या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर आणि नऊवारी साड्या व डोळ्यावर काळा गॉगल घालून अनेक महिलांना बाईक राईडही केली. यातील अनेक तरुणींचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यातच एका व्हायरल गर्लला पोलिसांचा दम खावा लागला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गिरगावच्या शोभायात्रेत अबालवृद्धांनी सहभागी होत नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. पारंपरिक कला, लोकनृत्य आणि वाद्यांच्या गजरासोबतच विविध सामाजिक संदेश देणारे देखावेही सादर करण्यात आले होते. या शोभायात्रेत अनेकांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या शोभायात्रेतून एक तरुणी चांगलीच व्हायरल झाली. तिचं नाव गौरी मोरे. तिच्या लुकने सर्वांच्या नजरा वेधून घेतल्या. मात्र तिला यावेळी पोलिसांचा कावा खावा लागला.
नेमकं काय घडलं -
गिरगावच्या शोभायात्रेतील व्हायरल गर्ल गौरी मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शोभायात्रेत शेकडो लोक सहभागी होत असतात यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. शोभायात्रेत गौरी एका हायपर स्पोर्ट्स बाईकवर बसलेली आणि गाडीला गर्दीतच रेस देत होती. तेवढ्यात एक महिला पोलीस अधिकारी तिथे आल्या आणि त्यांनी गौरी मोरेसह तिथे असलेल्या एका तरुणाला झाप झाप झापलं.

या व्हिडीओमध्ये गौरी Kawasaki Ninja H2 या हायपरस्पोर्ट बाईकवर बसलेली दिसत आहे. ती बाईकला रेस देत असल्याचं दिसतं. त्यावेळी महिला पोलीस अधिकारी तेथे येथे व इथं काय चाललंय, आम्ही वेडे आहोत का, असं म्हणत गर्दीला मागे हटण्याचे आदेश देते. यावेळी काही स्थानिक नागरिकांनीही बाईकस्वाराविरोधात नाराजी व्यक्त करत, पोलीसांचे कौतुक केले.
