जेएनएन, मुंबई, Fetus in Fetu Case Buldhana: महाराष्ट्रातील डॉक्टरांने मोठा चमत्कार घडवून आणला आहे. देवदूतच्या स्वरपाने डॉक्टरने केला चमत्कार केला आहे.
पोटात 2 अर्भकं
बुलढाण्यातील 3 दिवसाच्या बाळाच्या पोटातून ऑपरेशन करून 2 बाळ बाहेर काढले आहे. पोटात अर्भक असलेल्या गुंतागुंतीचं ऑपरेशन भारतात पहिल्यांदाच डॉक्टरकडून करण्यात आले आहे. बुलढाण्यातील पोटात अर्भकं असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
डॉक्टर आश्चर्यचकीत
ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकीत करणारे होते. अमरावतीच्या संदर्भ रुग्णालयातील डॉक्टरांनी खूप गुंतागुंतींची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटातून दोन अर्भकं शस्ज्ञक्रिया करुन बाहेर काढण्यात आले आहे. या गुंतागुंतीच्या ऑपरेशनला वैद्यकीय क्षेत्रातील मोठा चमत्कार मानला जात आहे.
डॉक्टरकडून विशेष काळजी
बुलढाण्यातील एका गरोदर महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अर्भक असल्याचं सोनोग्राफी मध्ये कळले होते. बाळावर ऑपरेशन करण्याचा निर्णय हॉस्पिटलने घेलते होते. गुंतागुंतीचं ऑपरेशन असल्याने डॉक्टरकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.
ऑपरेशननंतर बाळ सुखरूप
3 दिवसांच्या बाळाच्या पोटात 1 नव्हे तर तब्बल 2 अर्भकं होती. जवळपास एक तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरांनी हे दोन्ही अर्भक बाळाच्या पोटातून यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. ऑपरेशननंतर बाळ सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Milkipur By Election Voting Updates: मिल्कीपुर मध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 13 टक्के मतदान, सपा कडून गंभीर आरोप
देशातील पहिलीच घटना
शस्त्रक्रियेसाठी बाळाला अमरावतीच्या विभागीय सेवा केंद्रात दाखल करण्यात आले होते. 12 डॉक्टर आणि नर्सच्या चमूने ही मोठी कामगिरी केली आहे. पुरुष जातीच्या बाळाच्या पोटातून बाळ काढल्याची देशातील पहिलीच घटना समोर आली आहे. बाळावर यशस्वी ऑपरेशन करणारे डॉक्टरचे देशभरात कौतुक केले जात आहे.