मुंबई/नागपूर Maharashtra Municipal Election 2026 Latest News: राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांदरम्यान मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, अमरावतीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये मतदान केंद्रांवर EVM मशीन अचानक बंद पडल्याच्या घटना घडली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे.

सकाळपासून मतदानासाठी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असताना, अचानक काही मतदान केंद्रांवरील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) काम करत नसल्याने मतदान थांबवावं लागलं. अनेक ठिकाणी मतदारांनी तासन्‌तास रांगेत उभं राहूनही मतदान न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

मतदान केंद्रांवर गोंधळ, मतदारांचा संयम सुटला

मुंबईतील दक्षिण व उपनगर भाग, पुण्यातील कोथरूड, हडपसर, शिवाजीनगर परिसर, नागपूर पूर्व-पश्चिम भाग, अमरावती शहर, तसेच धुळे महापालिका हद्दीत EVM बंद पडल्यामुळे काही केंद्रांवर मतदान पूर्णपणे ठप्प झालं. 

एका बाजूला ‘बूथ सापडत नाही’चा गोंधळ सुरू असतानाच, आता EVM बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली, आणि त्यामुळे अनेक ठिकाणी मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याच्याही घटना घडले आहे. 

 “तासभर उभे आहोत, पण मतदानच नाही” – संतप्त मतदार

    “सकाळपासून रांगेत उभे आहोत, पण मशीन बंद आहे… कुणीही नीट माहिती देत नाही,” अशा संतप्त प्रतिक्रिया अनेक मतदान केंद्रांवरून ऐकायला मिळत आहेत.

    ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदारांची विशेष गैरसोय होत असल्याचं चित्र असून, काही ठिकाणी नागरिक मतदान न करताच परतल्याच्याही घटना समोर आले आहेत.

    तांत्रिक पथक धावलं, पर्यायी EVM मागवण्यात आले

    EVM बंद पडताच निवडणूक यंत्रणेकडून तांत्रिक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी राखीव (रिझर्व्ह) EVM मशीन मागवण्यात आली असून, दुरुस्ती आणि बदलाची प्रक्रिया सुरू आहे.