जेएनएन, मुंबई: राज्यात अनेक बोगस मच्छिमार आहेत. शासनाकडून बोगस मच्छिमार लाभ घेत आहेत, तो लाभ तत्काळ बंद करावा, अशी मागणी मच्छिमार संघटनाचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे.
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा दिला आहे, मात्र त्याचा लाभ बोगस मच्छिमार घेणार आहे. त्यामुळे अस्सल मच्छिमारचा प्रमाणपत्रच्या आधारे शासनाने लाभ द्यावा अशी मागणी चंदू पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारने कोस्टल रोडच्या कामात झालेल्याची नुकसान भरपाई अजूनही दिली नाही ती त्वरित द्यावी अशी मागणी मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष चंदू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारकडे केली आहे. राज्य सरकारने धोरण ठरवून ही अधिकारी धोरणाची अमंलबजावणी करत नाही अशी नाराजी ही चंदू पाटील यांनी अजित पवारांकडे व्यक्त केली आहे.
मुंबई आणि नवी मुंबईच्या कोस्टल भागात मोठ्या प्रमाणात पारंपारिक मच्छिमार आहेत. अनेक मच्छिमारकडे प्रमाणपत्रे आहेत, परंतु त्यांना राज्य सरकारकडून अजूनही लाभ मिळाला नाही. अशा पारंपारिक मच्छिमाराला आर्थिक लाभ आणि कोस्टल रोड बांधकाम दरम्यान झालेली नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी करत मच्छिमार संघटना आक्रमक झाली आहे.
पारंपारिक मच्छिमारमध्ये बोगस मच्छिमारची घुसखोरी सहन करणार नाही. घुसखोरी रोखली नाही तर आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा मच्छिमार संघटनाने राज्य सरकारला दिला आहे. नवी मुंबईतील मोरवे, उरण गावात काल मच्छिमार संघटनाची बैठक पार पडली. त्या बैठकीत आक्रमक आंदोलन करण्याचा निर्णय झाल्याची माहिती चंदू पाटील यांनी दिली आहे.