जेएनएन, परभणी. राज्यात महानगरपालिकांसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या 15 तारखेला राज्यात महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत. राजकीय नेत्यांच्या विविध ठिकाणी सभा आणि बैठकी होत आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेन्जर ठरलेल्या लाडक्या बहिणींसाठी काय घोषणा होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
परभणी येथे आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींच्या लखपती दीदी योजनेबाबत महत्वपूर्ण घोषणा केली. या योजनेला भाजपने बहुमत मिळाल्यानंतरही बंद केले नाही आणि जोपर्यंत आपण मुख्यमंत्री पदावर आहोत, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट
महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख महिला ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत, तर परभणी जिल्ह्यात एकट्या मेघना दीदींनी 1 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. यावर्षी देशभरात 1 कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
LIVE | परभणी महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'जाहीर सभा'
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2026
🕓 दु. ३.५५ वा. | ५-१-२०२६📍परभणी.@BJP4Maharashtra#Maharashtra #Parbhani #परभणी_महानगरपालिका https://t.co/9BS7cAGhIF
‘देवाभाऊ’ तुमची काळजी घेईल
परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना नेस्तनाबूत करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. जुना इतिहास विसरून भविष्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करत, परभणीला पालकमंत्री म्हणून मेघना दीदी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचा झेंडा परभणीत लावण्याचे आवाहन करत, त्यानंतर पाच वर्षांसाठी ‘देवाभाऊ’ तुमची काळजी घेईल, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.
