मुंबई. BMC Election 2026 : बीएमसी निवडणुकीसाठी प्रसासानाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन्स हैदराबादहून कडक सुरक्षेत मुंबईत आणल्या जात आहेत. बीएमसी निवडणुकीसाठी २५,००० ईव्हीएम वापरले जाणार असून यासाठी एकूण २८ ट्रक वापरले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुका पुढील वर्षी जानेवारीमध्ये होण्याची अपेक्षा आहे. हैदराबादहून ईव्हीएम वाहून आण्यासाठी 40 फूट (18 टायर) ट्रक वापरले जात आहेत.
ईव्हीएम वाहून आणणाऱ्या प्रत्येकी पाच ट्रक कडक सुरक्षा व्यवस्थेत एकावेळी रवाना केल्या जात आहेत. प्रत्येक ट्रकसोबत तहसीलदार दर्जाचा अधिकारी तैनात आहे. या ट्रकांना पोलिसांकडून कडक सुरक्षा पुरविली जात आहे. या बाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, हैदराबादहून 25,000 ईव्हीएम मुंबईत आणण्यासाठी सविस्तर वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
जीपीएसद्वारे ट्रकच्या हालचालीचा मागोवा -
प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले की, एका ट्रकसोबत प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ड्युटीवर नियुक्त केले जात नाही. प्रत्येक ट्रकला संपूर्ण प्रवासात दोन वाहनांनी सुरक्षा दिली जाते. जिल्ह्यात मुक्काम करताना, तेथे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असते. हे ईव्हीएम मुंबईतील दोन गोदामांमध्ये ठेवले जात आहेत, जिथे 24 तास सुरक्षा व्यवस्था उपलब्ध आहे. कोणत्याही समस्येच्या बाबतीत मशीनची कमतरता भासू नये म्हणून अतिरिक्त ईव्हीएमची ऑर्डर केली आहे. ईव्हीएम वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे, जेणेकरून प्रवासादरम्यान ट्रकच्या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
या ईव्हीएमची वाहतूक करण्यासाठी 40 फूट लांबीचे 28 ट्रक वापरले जात आहेत. प्रत्येक ट्रकसोबत तहसीलदार दर्जाचा अधिकारी ड्युटीवर तैनात आहे.
मतदार यादीतील विसंगतीबाबत सूचना करण्याचा आज अंतिम मुदत -
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीत विसंगती असल्याच्या असंख्य तक्रारी आल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने सूचनांसाठी एक आठवडा वाढवला आहे. नागरिक आता 27 नोव्हेंबरऐवजी 3 डिसेंबरपर्यंत सूचना सादर करू शकतात. त्या सूचनांचा विचार केल्यानंतर, अंतिम यादी 10 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. बूथनिहाय यादी आता 8 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, तर मतदान केंद्रानुसार मतदार यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर, मुंबई महापालिकेकडून मतदार यादीतील चुका दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
