जेएनएन, मुंबई. Badlapur Encounter: बदलापूर मधील दोन शाळेकरी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलीस एन्काऊंटर मध्ये मृत्यू झाला. या प्रकरणी आज उच्च न्यायालयात अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटरवर सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयकडून सुनावणी करतांना हा एन्काऊंटर म्हणता येणार नाही असे ताशेरे महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारवर ओढले.
जखमी पोलीस अधिकाऱ्याचे हाताच्या बोटांचे नमुने आजच घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. "अक्षय शिंदेला ज्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी मारली होती त्यांनी कमरेच्या खाली गोळी मारली पाहिजे होती.","अक्षय शिंदे प्रकरणातील सीसीटीव्ही कुठे आहेत" असा सवाल ही न्यायलयाने पोलिसांच्या वकिलाला यावेळी केला.
न्यायालयाने सर्व सीसीटीव्हीचे फुटेज चौकशीसाठी घेण्याचे आदेश दिले आहे. तळोजा जेलपासून ते हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंतचे सर्व फुटेजची चौकशी झाली पाहिजे असे आदेशही न्यायालयाने दिले आहे. तसेच अक्षय शिंदे यांच्या ज्या पिस्तूलने गोळ्या झाडल्या आहे त्या दोन्ही पिस्तूल बँलस्टिक तज्ञाकडून निरीक्षण करुन घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे.
अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाचे प्रश्न
- हे एन्काऊंटर नाहीत?
- गोळी कमरे खाली का मारली नाही?
- आरोपीला बुरखा घातलेला होता का?
- आरोपीच्या हाताचे ठसे का घेतले नाही?
- पोलिसांच्या हाताच्या ठस्यांची चौकशी झाली पाहिजे?
- पिस्तूलची तज्ञांनाकडून चौकशी झाली पाहिजे?
- पंचनाम्यात हाताच्या ठस्याचा उल्लेख नाही?
- सीसीटीव्ही फुटेजची चौकशी झाली पाहिजे?
- सर्व पाचही पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्डिंग ताब्यात घ्या?
- फोन आल्यावर वाहनचालकानं गाडी थांबवली होती का?
- अक्षय शिंदेंचा मृतदेह कुटुंबाला का दिला नाही?
असे प्रश्न आज उच्च न्यायालयने पोलीस आणि राज्य सरकारला विचारले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.