जेएनएन, मुंबई: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे किंवा आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड न करू शकलेल्या महिलांना सरकारने कोणतीही मुभा दिलेली नाही. त्यामुळे ज्यांची केवायसी बाकी आहे अशा महिलांनी जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्यासाठी जाऊ नये.

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र अनेक महिलांना ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या, कागदपत्र अपलोडमधील त्रुटी आणि आधार लिंकिंगच्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हजारो महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले होते.

दरम्यान, या योजनेतील मार्च आणि एप्रिल महिन्यांचे अनुदान वितरण मागील आठवड्यात बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली असून लाभार्थींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल अखेर राज्यात तब्बल 1 कोटी 77 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. उर्वरित महिलांची पडताळणी आणि कागदपत्र प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.

टीप - केवायसीसाठी जिल्हा महिला विभागात कागदपत्रे सादर मुभा देण्यात आली आहे. अशी बातमी मागे प्रसिद्ध झाली होती. मात्र ती अफवा असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मराठी जागरण वाचकांची दिलगिरी व्यक्त करते.