जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी 5 डिसेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंत असलेल्या शाळांना बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलनाचे कारण आणि मागण्या
मुख्य मागणी :— 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी Teacher Eligibility Test (TET) अनिवार्य करू नये. शिक्षणसंस्थांनी 15 मार्च 2024 रोजी जाहीर केलेल्या Sanch Manyata Policy (संच मान्यता धोरण) अंतर्गत अनेक शाळा आणि शिक्षकांचा समावेश करून घ्यावे.

‘शिक्षणसेवक’ (contractual / पद्धत बदललेली) मॉडेल हटवून सर्व शिक्षकांना नियमित पगारपट्टीवर (regular pay scale) आणावे. 

शाळांवरील ऑनलाइन किंवा शिक्षणाशिवायचे अतिरिक्त काम (non-academic tasks) बंद करावे; मुख्य काम म्हणजे शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. 

ग्रामीण आणि दुर्गम भागातील, विद्यार्थी कमी संख्या असलेल्या शाळांना बंद करण्याऐवजी, त्यांना सुरक्षित ठेवून मान्यता द्यावी; त्याच प्रमाणे सरकारने 15 मार्च 2024  निर्णय मागे घ्यावा. दरम्यान शिक्षक संघटनांनी म्हटले आहे की, सर्व मागण्या वर्षानुवर्षे प्रशासनाकडे प्रलंबित आहेत, पण सरकार त्याकडे दुर्लक्ष  करत आहे.त्यामुळे 5 डिसेंबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून  जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे मोर्चा काढण्यात येत आहे.

शाळा बंद, आंदोलन सुरू
5 डिसेंबर रोजी सर्व शासकीय, अनुदानित आणि अनेक खासगी शाळा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. फक्त बंदच नव्हेतर राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालये समोर मोठा मोर्चा काढण्याचा नियोजन आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे संघटनांनी केला आहे.

हेही वाचा: पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवलाच नाही? केंद्र–राज्य संवादात तफावत, राज्याच्या कृषीमंत्र्यांकडून स्पष्टीकरण