एजन्सी, मुंबई. Lalbaugcha Raja Incident: मध्य मुंबईतील लालबागच्या राजा गणेश मंडपाजवळ मित्रांसोबत बसलेला असताना हृदयविकाराचा झटका आला. यात पुण्यातील एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
ही घटना गुरुवारी घडली, जेव्हा जयदीप मेघराज नेमाडे असे नाव असलेला हा तरुण मंडपाशेजारील एका इमारतीबाहेर बसला असताना त्याच्या छातीत अचानक अस्वस्थता जाणवू लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला रुग्णवाहिकेतून (ॲम्बुलन्समधून) जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे ते म्हणाले.
काळाचौकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे सांगून मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी कोणताही संशय किंवा तक्रार व्यक्त केलेली नाही, असेही अधिकाऱ्याने नमूद केले.
हेही वाचा - तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश! रुग्णांना मिळणार दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
कुटूंबातील एकुलता एक मुलगा, पुण्यात नोकरी
जयदीप हा जळगावमधील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे (रा. जीवनमोती सोसायटी, जळगाव) यांचा एकुलता एक मुलगा होता. जयदीपने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले होते. त्यानंतर त्याने एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले होते. जयदीप शिक्षण पूर्ण करून पुण्यात नोकरी करत होता. दरवर्षी तो मित्रांसोबत लालबागचा राजाच्या दर्शनाला यायचा. यावेळी तो दर्शनाला आला आणि ह्रदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला.
