जेएनएन, मुंबई. Weather Update Today: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी हे चिंताग्रस्त झाले होते. मात्र, आता IMD ने जाहीर केलेल्या नवीन अहवालानुसार शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल अनेक भागात सरी कोसळल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच आजही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट दिला आहे.
ग्रामीण भागात कोरडवाहू शेतीवरील पिके वाळू लागली आहेत. मात्र, आता पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळाला आहे. तर काही भागात पाऊस कोसळत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आज या भागात पावसाचा अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे.
उद्या या भागात पावसाचा अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे घाट, पुणे, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचा - तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश! रुग्णांना मिळणार दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबईत कसे राहिल हवामान
मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शहरात व उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
