जेएनएन, पंढरपूर. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आज कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. आज पहाटे अडीच वाजता एकनाथ शिंदे सपत्नीक आणि मानाच्या शेतकरी दाम्पत्याने पांडुरंगाची पूजा अर्चना केली.
नांदेडमधील शेतकऱ्याला महापूजेचा मान
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव येथील शेतकरी भाविक सुधाकर दशरथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रणिता सुधाकर शिंदे या दांपत्याला मिळाला.
एकनाथ शिंदेंनी विठुरायाला घातले साकडे
बळीराजावरील संकट, दुष्काळाचे सावट दूर कर आणि बळीराजाला ताकद दे असे साकडे शिंदे यांनी विठुरायाला घातले. विठूरायाच्या गजरात आज पंढरपूर नगरी दुमदुमली. हरिनामाचा जयघोष झाला. पंढरपुरात भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. विठुरायाच्या पंढरीत भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.
माझ्याकडे संकटात आलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने परत जाऊ नये, एवढीच मागणी मी कायम पांडुरंगाकडे करत आलो आहे. सध्या अडचणीत असलेल्या बळीराजाला या संकटातून बाहेर काढ, असे साकडे मी आज विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी घातले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायानेही पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
शिंदे म्हणाले की, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान खूप मोठे असते. वारकरी संप्रदायामुळे आम्हाला ऊर्जा आणि बळ मिळत असते. समाजातील प्रत्येक घटकाला आधार देण्याची प्रेरणा या आध्यात्मिक परंपरेतून मिळते. सध्या शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत असून, या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मदतीचे हात पुढे येणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी हजारो-लाखो हात मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. वारकरी संप्रदायामध्ये समाजाला एकत्र आणण्याची,संकटात असलेल्या माणसाला आधार देण्याची ताकद आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायानेही बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
पांडुरंगाच्या दर्शनातून आणि वारकऱ्यांच्या सहवासातून मिळणारी ऊर्जा ही समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देते. राजकीय पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा आध्यात्मिक परंपरेचे महत्त्व मोठे आहे. या परंपरेतून मिळणाऱ्या शिकवणीच्या आधारे समाजातील गरजू आणि संकटग्रस्त लोकांना मदतीचा हात देणे आवश्यक असे आवाहन ही शिंदे यांनी
Eknath Shinde Live l श्री क्षेत्र पंढरपूर पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ।। ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ◆ कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वकाळी श्री विठ्ठल - रुक्मिणीची शासकीय महापूजा - लाईव्ह https://t.co/nKrCatv7Qe
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 20, 2026
हेही वाचा - Tulsi Vivah 2026: आज तुळशी विवाह; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि योग्य पूजा विधीची संपूर्ण माहिती
